हमने ढूंढ निकाला....! डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली शत्रूच्या जबड्यातून सैनिकाला वाचवण्यासाठी आखलेल्या थरारक मोहिमेची इनसाइड स्टोरी

Foto
वॉशिंगटन : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धात इराणमध्ये कोसळलेल्या अमेरिकन लढाऊ विमानातील वायू सैनिकाला अमेरिकेने एक अत्यंत धाडसी आणि थरारक मोहीम आखत सुरक्षितपणे बाहर काढले. खरेतर ही मोहीम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या थरारक मोहिमेची पुष्टी केली. ट्रम्प यांनी याला अमेरिकन इतिहासातील सर्वात धाडसी मसर्च अँड रेस्क्यूफ ऑपरेशन्सपैकी एक म्हटले आहे.

इराणने अमेरिकन हवाई दलाचे ऋ-१५ए स्ट्राईक ईगल विमान दक्षिण इराणमध्ये पाडले होते. विमानात एक पायलट आणि एक वेपन सिस्टम ऑफिसर असे दोन क्रू मेंबर्स होते. विमानाला आग लागण्यापूर्वीच दोघांनी यशस्वीपणे इजेक्ट केले. पायलटला काही तासांतच वाचवण्यात अमेरिकेला यश आले. मात्र दुसर्‍या क्रू मेंबरचा शोध घेणे जरा आव्हानात्मक ठरले. हा सैनिक इराणच्या दुर्गम डोंगराळ भागात लपून शत्रू सैन्यापासून स्वतःचा बचाव करत होता. सुमारे एक दिवस हा सैनिक शत्रूच्या जबड्यात एकटाच होता. पकडले जाण्याची  भीतीही होती. मात्र त्याला शोधण्यात अमेरिकेला यश आले.

या बचाव मोहिमेसंदर्भात काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?  
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेसंदर्भात त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, आम्ही त्याला शोधून काढले. ही आपल्या इतिहासातील सर्वात धाडसी शोध आणि बचाव मोहिमांपैकी एक आहे. हा शूर सैनिक इराणच्या पर्वतांमध्ये, शत्रूच्या प्रदेशात लपलेला होता. शत्रू त्याचा शोध घेत होते. तसेच, संबंधित वैमानिकाच्या प्रकृतीसंदर्भात सांगताना ट्रम्प म्हणाले, तो काही दुखापत जाली आहे, तो पूर्णपणे बरा होईल.

सीआयएची म्हत्वाची भूमिका - 
अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएफने या मोहिमेसंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली. शत्रूची दिशाभूल करण्यासाठी सीआयएने वैमानिक आधीच सापडल्याची अफवा पसरवली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचे नेमके लोकेशन शोधून सैन्याला दिले. बचाव मोहिमेदरम्यान अमेरिकन स्पेशल फोर्सेसने जोरदार हवाई संरक्षण आणि गरजेनुसार एअरस्ट्राइकचा वापर करत आपल्या सैनिकाला बाहेर काढले.